लक्ष असतं माझं या आपल्या दैनंदिन कार्यक्रमात आपण दररोज घडणाऱ्या बातम्यांमधील महत्वाच्या विषयावर 'काहीतरी नवीन बातमीच्या पलीकडील' माहिती तुमच्यापर्यंत पोहचवत असतो. या कार्यक्रमातून साम टीव्हीचे कार्यकारी संपादक प्रसन्न जोशी दररोज समाजातील विविध विषयावर त्यांचे परखड मत मांडणार आहेत. Saam TV is Maharashtra's number one 24-hour news channel 'Laksha Asta Majha' with renowned TV anchor and Saam's editor in chief Mr Prasanna Joshi. Through the show, Prasanna Joshi discusses his take on all the recent political and current happenings. He also gives his personal views on what is going on in the country and the world. As the name suggests, the show revolves around Mr Joshi's opinion on trending events in the country.
Thu, October 20, 2022
अखेर निवडणुकीचा उपचार संपून मल्लिकार्जुन खरगे काँग्रेसचे बऱ्याच काळानंतर बिगर गांधी अध्यक्ष झाले. त्यांच्यासमोर आव्हाने कोणती? यावर बरीच चर्चा झाली, मात्र तें यशस्वी का होण्याची शक्यता आहे, तें सांगणारा आजचा #लक्ष असतं माझं
Wed, October 19, 2022
महाराष्ट्राला आता राज्यगीत मिळालं आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि मराठीच्या, मराठी माणसाच्या अस्मितेचा अर्क असलेल्या या गाण्यावरच आहे आजचा #लक्ष असतं माझं
Tue, October 18, 2022
ज्या पोटनिवडणुकीमुळे शिवसेनेचे नाव व चिन्ह जाऊन दोन नावं आणि चिन्ह जन्मली, त्या मुंबईतील अंधेरीची पोटनिवडणूक अखेर बिनविरोध होण्याची चिन्ह आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या 'पत्र'कारितेमुळे भाजपने आपला उमेदवार मागे घेतला, असं म्हटलं जातंय. मात्र, नवरा गेला तिथं पत्नीला बिनविरोध निवडून द्या, अशा न्यायाने लोकशाही चालवायची का? यावरच आहे आजचा #लक्ष असतं माझं
Thu, October 13, 2022
सध्या महाराष्ट्रात 1, 2 नाही...चार चार हिंदुत्ववादी पक्ष झालेत. सगळेच म्हणतायत आम्ही हिंदुत्ववादी! पण, मुळात हिंदुत्व म्हणजे काय? या पक्षांचं हिंदुत्व कोणत्या व्याख्येत बसतं? यावरच आहे आजचा #लक्ष असतं माझं
Wed, October 12, 2022
गुजरातमध्ये सध्या निवडणुकीचे वारे वाहू लागलेत. त्यातच, पंतप्रधान मोदींनी गुजरातेत अर्बन नक्षल घुसलेत, असा दावा केलाय. एकीकडे भारत सरकार अर्बन नक्षल असल्याचं अधिकृतरित्या नाकारत असताना मोदीच असा दावा करत असतील तर विषय गंभीर आहे. यावरच आहे आजचा #लक्ष असतं माझं
Tue, October 11, 2022
उद्धव ठाकरे आणि शिंदे गट यांची पुढची लढाई चिन्ह आणि पक्षाच्या नावावरून सुरु आहे. वस्तुत: निवडणूक आयोगाने अनेक चिन्ह पर्याय म्हणून दिली असताना विशिष्ट चिन्ह्नाना पसंती का असते? यावरच आहे आजचा #लक्ष असतं माझं
Fri, October 07, 2022
काल ठाकरे आणि शिंदे गटांचे मेळावे झाले. दोन्हीकडील समर्थक आमचाच मेळावा जोरदार म्हणतायत. मात्र, तटस्थपणे पाहिल्यास काय दिसतं? यावरच आहे आजचा लक्ष असतं माझं
Wed, October 05, 2022
'आदिपुरुष'वरून सध्या वाद सुरु झालेत. खासकरून त्यातील सैफ अली खानने साकारलेल्या रावण आणि देवदत्त नागेच्या हनुमानावर अगदी हिंदुत्ववाद्यांनीही आक्षेप घेतलेत. यावरच आहे आजचा 'लक्ष असतं माझं'
Tue, October 04, 2022
राहुल यांची 'भारत जोडो' यात्रा लवकरच महाराष्ट्रात येईल. आधी भाजपकडून दुर्लक्ष करण्यात आलेल्या या यात्रेकडे आता तेही गांभीर्याने पाहतायत. यावरच आहे आजचा लक्ष असतं माझं
Sat, October 01, 2022
राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्या शाळेतील सरस्वतीचे फोटो की सावित्रीमाईंचे, यावरील वक्तव्याने वाद निर्माण झाला. मात्र, अशी विभागणी आणि प्रतिकांची वाटणी कशाला? यावरच आहे आजचा #लक्षअसतंमाझं
Thu, September 29, 2022
'पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया'च्या पुण्यातील निदर्शनादरम्यान, 'पाकिस्तान जिंदाबाद' अशी घोषणा दिली गेली, असे दावे झाले. मात्र, पुणे पोलीसांनी यावर पुरेसा प्रकाश टाकला नाही. alt न्यूज सारख्या fact चेकिंग वृत्त संस्थेने तर अशा घोषणा झाल्याच नाहीत, असं fact चेक करून टाकलं. मात्र, 'साम' टीव्हीला काय दिसलं? यावरच आहे आजचा 'लक्ष असतं माझं'
Thu, September 29, 2022
आज जागतिक बातमी दिन. फेक न्यूज आणि प्रचारकी मीडियाच्या काळात चांगली बातमीदारी व पर्यायाने चांगली पत्रकारिता करण्यासाठी तुम्हा मायबाप प्रेक्षक, वाचकांचं तन मन आणि मुख्य म्हणजे धनपूर्वक सहकार्य हवंय. यावरच आहे आजचा #लक्ष असतं माझं
Thu, August 25, 2022
आज विधिमंडळ परिसरातला राडा सर्वांनी पहिला. ज्यांचे आदर्श घ्यायचे तेच एकमेकांवरी धावून जातायत. यावरच आहे आजचा #लक्ष असतं माझं
Wed, August 24, 2022
आज 'जागतिक वडापाव दिवस' आहे. यानिमित्त, आपल्या सर्वांच्या लाडक्या मराठामोळ्या या फास्ट फूडवर आजचा #लक्ष असतं माझं....
Tue, August 23, 2022
'आप'चे मनीष सिसोदिया आता केंद्रीय यंत्रणाच्या रडरावर आलेत. मात्र, यामुळे पुन्हा एकदा ईडी, सीबीआय भाजपच्या ईशाऱ्यावर चालतायत असा आरोप सुरु झालाय. त्यावरच आहे आजचा #लक्ष असतं माझं
Sun, August 21, 2022
बॉयकॉटमुळे आमीर खानची फिल्म 'लालसिंग चढढा'ला मोठा फटका बसला. पण, आता ज्या प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया येतायत आणि स्वतः ही फिल्म पाहिल्यावर जे वाटलं, त्यावरच आहे आजचा #लक्ष असतं माझं
Wed, August 17, 2022
भाजप नेते आणि मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सरकारी कामकाजात यापुढे 'हॅलो' ऐवजी 'वंदे मातरम' म्हणावे, असा निर्णय घेतलाय. यावरून उलट-सुलट प्रतिक्रिया येऊ लागल्यात. यावरच आहे आजचा #लक्ष असतं माझं
Tue, August 16, 2022
शिवसंग्राम संघटनेचे नेते आणि मराठा आरक्षण लढाईतील अग्रणी विनायक मेटे यांचं अपघाती निधन धक्का देणारं ठरलं. यानिमित्ताने जगभर युद्धापेक्षाही जास्त जीव घेणाऱ्या अपघातांबद्दल आणि त्यावरील सुरक्षेच्या उपायांबद्दल आहे आजचा #लक्ष असतं माझं
Sat, August 06, 2022
#'लक्षअसतंमाझं'मध्ये परवा सुबोध भावे, आमिर खान यांच्यावरील एपिसोड नंतर अनेकांनी यापूर्वी विक्रम गोखले, कंगना राणावत यांच्यावरील एपिसोडचे दाखले देत एकांगीपणाचे आरोप केले. त्यालाच उत्तर देणारा आजचा #लक्ष असतं माझं
Tue, August 02, 2022
भाजप चे राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा यांनी आज एकेठिकाणी अशा आशयाचे विधान केले की देशात फक्त भाजप राहील आणि अन्य पक्ष नष्ट होतील. मात्र, इतिहास काय सांगतो? यावरच आहे आजचा #लक्ष असतं माझं
Sat, July 30, 2022
राज्यपाल कोश्यारी यांनी मुंबई-ठाण्यातून गुजराती-राजस्थानी बाहेर गेले तर मुंबईचं आर्थिक राजधानी पद जाईल, अशा आशयाचं वक्तव्य नुकतंच केलं. अपेक्षेप्रमाणे कोश्यारी यांच्या नावाने सर्व मराठी जनांनी खडे फोडले. मात्र, त्या पलिकडे जाऊन वास्तवाला भिडण्याची हिंमत दाखवू का आपण? यावरच आहे आजचा #लक्ष असतं माझं
Sat, July 30, 2022
आज निहार ठाकरे यांची पत्रकार परिषद पहिल्यानंतर ते 'लंबी रेस का घोडा' आहेत, हे जाणवलं. त्यावरच आहे आजचा #लक्ष असतं माझं
Sat, July 23, 2022
शिवसेना फुटली आहे. आता तर शिवसेना कुणाची? हाच सवाल आहे. अशा स्थितीत आदित्य ठाकरे कंट्रोल घेऊ पाहतायत. थेट एकनाथ शिंदेना आवाज देतायत. म्हणूनच, त्यांच्यात आणि 'सरकार राज'मधले अभिषेक बच्चन यांच्यात मला साम्य वाटतं. यावरच आहे आजचा #लक्ष असतं माझं
Fri, July 22, 2022
भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी नुकतेच एक व्हिडीओ ट्वीट केला. यात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे वाटतील अशा एका पुरुषाबत एक महिला दिसते. त्यावरून मोठं वादळ उभं झालंय. यावरच आहे आजचा #लक्ष असतं माझं
Thu, July 21, 2022
सुप्रीम कोर्टाने ओबीसी आरक्षण व त्यामुळे खोळंबलेल्या निवडणुकांचा मार्ग मोकळा केला. मात्र, त्यासाठी आधार असलेल्या बांठीया आयोगाच्या अहवालावर प्रश्न उभे राहणं थांबलेलं नाहीये. यावरच आहे आजचा #लक्ष असतं माझं
Tue, July 19, 2022
बऱ्याच राजकारणानंतर आणि अनेक वर्षांच्या मागणीनंतर आता औरंगाबादचं नाव छत्रपती संभाजी नगर होत आहे. त्या पार्श्वभूमीवर नामांतर, त्या मागच्या अस्मितेचा विचार आणि राजकारण यावर आहे आजचा #लक्ष असतं माझं
Sat, July 16, 2022
भाजपच्या द्रौपदी मुर्मू आणि भजपेतर पक्षांचे यशवंत सिन्हा हे राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीचे प्रमुख उमेदवार असणार आहेत. मात्र, केवळ भाजपच्या संख्यांबळामुळेच नव्हे, तर मुर्मू या त्यांच्या आदिवासी पार्श्वभूमी व कर्तबगारीनेही उजव्या आहेत. दुसरीकडे, सिन्हा मात्र मुर्मू यांनाच उपदेश करतायत. यावरच आहे आजचा #लक्ष असतं माझं
Thu, July 14, 2022
आज गुरु पौर्णिमेनिमित्त एक संवाद, अभिवादन माझ्या आयुष्यातील ट्रोल मंडळींना! #लक्ष असतं माझं
Wed, July 13, 2022
नुकतंच नव्या संसदेच्या आवारातील चार सिंहाच्या राष्ट्रीय बोधचिन्हाचं अनावरण करण्यात आलं. त्यातील सिंह नेहमीपेक्षा उग्र दिसत असल्याचा मुद्दा मांडला जातोय. यापूर्वीही देवतांच्या अशा उग्र रुपमागील अर्थाबद्दल चर्चा झाली होती. यावरच आहे आजचा #लक्ष असतं माझं
Tue, July 12, 2022
श्रीलंकेत सध्या यादवीसारखं वातावरण आहे. ही परिस्थिती या निसर्गरम्य देशावर का आली? यातून आपण काय शिकावं? यावरच आहे आजचा #लक्ष असतं माझं
Sat, July 09, 2022
किरीट सोमय्यांनी उद्धव यांना 'माफिया CM' म्हटल्यावरून शिंदे गटातील आमदार भाजपला इशारे वगैरे देऊ लागलेत. हा काय प्रकार आहे? यावरच आहे आजचा #लक्ष असतं माझं
Fri, July 08, 2022
महाराष्ट्रातळ्या महा राजकीय घडामोडीनंतर एकीकडे आदित्य हे 'निष्ठा' यात्रा काढतायत, तर दुसरीकडे मनसेचे युवा नेता अमित ठाकरेही दौरे आखतायत. या दोन तरुण चुलत ठाकरे बंधुना काही फुकटचे सल्ले, यावरच आहे आजचा #लक्ष असतं माझं
Thu, July 07, 2022
एका माहितीपटाच्या पोस्टरमध्ये देवी काली हिचे विपर्यस्त चित्रण दाखवल्यानं जगभरातून हिंदूंच्या तिखट प्रतिक्रिया येतायत. यावरच आहे आजचा #लक्ष असतं माझं
Wed, July 06, 2022
अखेर महाराष्ट्रातल्या सत्तांतर नाट्याचा शेवटचा अंक संपत आलाय. मात्र, इतकी सारी पात्र असलेल्या या महानाट्यात राज ठाकरेंचं काय होणार, याचा कुणीच विचार केला नाही! यावरच आहे आजचा #लक्ष असतं माझं
Sat, July 02, 2022
काल फडणवीस मुख्यमंत्री नाहीत हे कळल्यावर महाराष्ट्र भाजपमध्ये वेगळंच वातावरण त्यात झालं. अनेक अर्थ यामागे लावले जातायत. त्यावरच आहे आजचा #लक्ष असतं माझं
Fri, July 01, 2022
गेल्या 10 दिवसांपासून सुरु असलेल्या राजकीय नाट्याची सांगता आज धक्कादायक क्लायमॅक्सने झाली. फडणवीसांऐवजी एकनाथ शिंदे यांचं नाव मुख्यमंत्री म्हणून स्वतः फडणवीसांनीच जाहीर केलं. यामागचं राजकारण खूप खोल आहे. यावरच आहे आजचा #लक्ष असतं माझं
Wed, June 15, 2022
पंतप्रधान मोदींनी नुकतीच 'अग्निपथ' योजनेची घोषणा केली. सैन्यात अल्प मुदतीच्या नोकरीची ही संधी आहे. मात्र, बिहारमध्ये या योजनेला विरोध झाला. सोशल मीडियावर टीकाही होऊ लागली. यावरच आहे आजचा #लक्ष असतं माझं
Wed, June 15, 2022
आज मुंबईत राजभवनातील क्रांतिकारक दालनाचा लोकार्पण सोहळा झाला. मात्र, सोहळा चर्चेत आलंय तो भलत्याच करणाने. राज्यपालांनी काहीही संबंध नसताना औरंगाबाद पाणी प्रश्नाचा उल्लेख करून, त्यावर 'मोदी है तो मुमकिन है' असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा अप्रत्यक्ष अपमान केला. हे वागणं योग्य आहे का? यावरच आहे आजचा #लक्ष असतं माझं
Tue, June 14, 2022
नुकतंच अमृता फडणवीस यांनी देहविक्रय करणाऱ्या महिलांना प्रतिष्ठा मिळायला हवी, अशा आशयाचं विधान केलं. त्यावरून बराच गदारोळ झाला. त्यांच्यावर टीकाही झाली. पण, काय चुकीचं बोलल्या त्या? यावरच आहे आजचा #लक्ष असतं माझं
Sun, June 12, 2022
भाजपतून काढलेल्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्माच्या प्रेषित मुहम्मद पैगंबर यांच्यावरील आक्षेपार्ह वक्तव्यावर चिडलेल्या मुस्लिम समाजाचा राग आज देशभर दिसून आला. मात्र, एका व्यक्तीच्या निषेधासाठी इतका उद्रेक योग्य आहे? यावरच आहे आजचा #लक्ष असतं माझं
Tue, June 07, 2022
प्रेषित मुहंमद यांच्याबद्दल आक्षेपार्ह बोलल्याबद्दल आणि अशाच वागणुकीसाठी भाजपच्या दोन प्रवक्त्यांवर त्यांच्या पक्षाने कारवाई केली. मात्र, यानंतर मध्य आशियातील मुस्लिम देशात आता भारत विरोध सुरु झालाय. यावरच आहे आजचा #लक्ष असतं माझं
Thu, June 02, 2022
तरुण आवाजाचा दिलखुलास गायक केकेचा काल अचानक मृत्यू झाला. त्याच्या आठवणी तर सगळेच जागवतायत. मात्र, त्याच्या या अकाली मृत्यूने शिकवलेला धडा कळलाय का तुम्हाला? यावरच आहे आजचा #लक्ष असतं माझं
Tue, May 31, 2022
मोदी सरकारला 8 वर्ष पूर्ण होतायत. नुकतेच मोदी म्हणाले की तयाच्या सरकारने देशवासियांची मन खाली जाईल, असं एकही काम केलं नाही. खरंच असं आहे का? यावरच आहे आजचा #लक्ष असतं माझं
Fri, May 27, 2022
भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी obc आरक्षणावरून सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली. त्यावेळी, "जमत नसेल तर घरी जा, स्वयंपाक करा"असं पाटील म्हणाले. त्यावरच आहे आजचा #लक्ष असतं माझं
Thu, May 26, 2022
शरद पवारांनी ही मागणी केल्याने चर्चा सुरु झालीये. यावरच आहे आजचा #लक्ष असतं माझं
Wed, May 25, 2022
हार्दिक पटेल सोडा, खुद्द पृथ्वीराज चव्हाण म्हणतायत की चिंतन शिबिरात चिंतन झालं नाही. यावरच आहे आजचा #लक्ष असतं माझं
Fri, May 20, 2022
राज यांचं अयोध्या दौरा स्थगित झाल्याने वेगवेगळे अर्थ काढले जातायत. त्यावरच आहे आजचा #लक्ष असतं माझं
Fri, May 20, 2022
दिग्दर्शक अभिजीत पानसे यांची 'रान बजार' ही वेबसिरीज येतेय. त्यातील एका टीजरमध्ये अभिनेत्री प्राजक्ता माळीचे बोल्ड सीन्स आहेत. मात्र, यावरून आता तिला ट्रोल केलं जातंय. पण, ज्या महाराष्ट्रात 'सखाराम बाईंडर'सारख्या नाटकांपासून ते अनेक चित्रपटांत बोल्ड सीन आले, तिथं हा गहजब कशाला? यावरच आहे आजचा #लक्षअसतंमाझं
Tue, May 17, 2022
काँग्रेसच्या नुकत्याच झालेल्या संकल्प शिबिरात राहुल यांनी प्रादेशिक पक्षांवर टीका केली. प्रादेशिक पक्षांना विचारसरणी नसते, असा दावा त्यांनी केला. मात्र, राहुल यांचं हे मत वस्तुस्थिती आहे की अहंकार? यावरच आहे आजचा #लक्ष असतं माझं
Thu, May 12, 2022
राणा दाम्पत्याला सध्या मीडिया मोठं महत्व देतोय. त्यांची दुःख असतलीही. पण, बीडमध्ये एका संसाराची राख झाली. त्यावर कोन अश्रू ढाळणार? यावरच आहे आजचा #लक्ष असतं माझं
Tue, May 03, 2022
राज ठाकरे यांच्या कालच्या भाषणानंतर रायगडावरील शिवसमाधी चर्चेत आलीये. दुसरीकडे, मुख्यमंत्री शिवसेना आणि भाजपमध्ये बाबरी कुणी पाडली यावरून वाढदिवसाच्या सुरु झालाय. यावरच आहे आजचा #लक्ष असतं माझं
Wed, April 27, 2022
गेले काही दिवस मुंबईत हनुमान चालीसा पठणावरून राणा दाम्पत्य आणि ठाकरे यांच्यात ड्रामा रंगलाय. मात्र, याला पत्रकारिता म्हणायचं का? याला राजकारण तरी म्हणायचं का? यावरच आहे आजचा #लक्ष असतं माझं
Fri, April 22, 2022
ब्राह्मण दंगल घडवतात, लग्नात भट बायकोच मागतो वगैरे गोष्टी गेल्या काही दिवसात ऐकायला आल्या. दुसरीकडे, मुसलमानांबद्दल तर देशभर विखारी वातावरण बनवलं जातंय. एखादा जिल्हा हिंदुत्ववादी ठरवला जातोय. याच प्रवृत्तीवर बोट ठेवणारा आहे, आजचा #लक्ष असतं माझं
Tue, April 19, 2022
RRR असो की KGF 2 दक्षिणेच्या अनेक फिल्म्स देशभर बॉक्स ऑफिस गाजवतायत. महाराष्ट्रातही या फिल्म्स्ना मोठा प्रतिसाद आहे. यावरच आहे आजचा #लक्ष असतं माझं
Tue, April 19, 2022
नुकताच पुण्यात होऊ घातलेला नास्तिक मेळावा पोलिसांकडून आक्षेप घेण्यात आल्याने रद्द करण्यात आला. दुसरीकडे, राज ठाकरे यांनीही शरद पवार यांच्या कथितरित्या नास्तिक असण्याबद्दल टीका केली. त्यामुळे नास्तिकांना खलनायक ठरवलं जातंय का? यावरच आहे आजचा #लक्ष असतं माझं
Sat, April 16, 2022
सरसंघचालक मोहन भागवत यांनी काल 15 वर्षात अखंड भारत, हिंदुत्व यावर विचार मांडले. मात्र, त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण होतात. त्यावरच आहे आजचा #लक्ष असतं माझं
Sat, April 09, 2022
#लक्षअसतंमाझं
Tue, April 05, 2022
राज ठाकरे आता जोरकसपणे हिंदुत्वाचं राजकारण करतायत. विकासाची ब्लूप्रिंट ते मशादीवरचे लाऊडस्पीकर असा हा प्रवास आहे. मात्र, राज यांना भावनिक राजकारणाच्या वाटेवर आणण्यात जनतेचा काहीच वाटा नाही? यावरच आहे आजचा #लक्ष असतं माझं
Wed, March 30, 2022
इंधन दरवाढीमुळे एकूणच महागाई वाढलीये. सध्या 'काश्मीर फाईल्स'ची दखल चक्क पंतप्रधान घेतात. म्हणूनच आपण आपल्या मराठी पल्लवी जोशीना विनंती करूया की यावरही फिल्म काढा! जरा केंद्र शासन लक्ष तरी देईल. #लक्ष असतं माझं
Wed, March 30, 2022
नुकत्याच पार पडलेल्या ऑस्कर सोहळ्यात अभिनेता विल स्मिथ यांनं सूत्रसंचालकाच्या मर्यादा ओलांडलेल्या कमेंट्समुळे कानाखाली भडकवली. यातून जगभरातील ट्रोलर आणि उथळ कमेंट करणाऱ्यांनीही बोध घ्यायला हवा. यावरच आहे आजचा #लक्ष असतं माझं
Fri, March 25, 2022
सध्या महिलांवरील अत्याचारांच्या अनेक घटना समोर येतायत. कुचिक प्रकरण गाजतंय. मात्र, या घटनांना राजकीय स्वरूप दिल जातंय का? यावरच आहे आजचा #लक्ष असतं माझं
Thu, March 24, 2022
राजकारण्यांच्या मागे लागल्याने संसाराची कशी वाट लागली, ते सांगणारी एक बातमी नुकतीच आली. खास राजकीय कार्यकर्त्यांचे डोळे उघडण्यासाठी, यावरच आहे आजचा #लक्ष असतं माझं
Wed, March 23, 2022
ईडीने केलेल्या कारवाईन राज्याचे राजकारण हादरले आहे. यावरच आहे आजचा #लक्ष असतं माझं
Thu, March 17, 2022
नुकतीच, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी, सोशल मीडियाचा कशाप्रकारे गैरवार होतोय व खासकरून निवडणुकीत त्याचा कसा प्रभाव पडतोय, यावर चिंता व्यक्त केली. मात्र, ज्या साधनाचा काँग्रेसनं शस्त्र म्हणून वापर करायचा त्यावरच टीका का? यावरच आहे आजचा #लक्ष असतं माझं
Sun, March 13, 2022
'आप'ला या निवडणुकीत पंजाबसारख्या राज्यात विजय मिळाला ही मोठी गोष्ट खरीच. पण, यापुढे देशात आणि त्यातही महाराष्ट्रात विस्तारण्यासाठी त्यांना फक्त 'दिल्ली मॉडेल'वर भिस्त ठेवून चालणार नाही. यावरच आहे आजचा #लक्षअसतंमाझं
Sat, March 12, 2022
एक व्हिडीओ क्लिप फिरतेय. पुण्यातल्या मेट्रोमध्ये बसलेल्या आजोबांना कुणीतरी विचारतं, की कसं वाटतंय? त्यावर ते म्हणतात, आताच बसलोय, जरा नंतर येऊन विचारा! यालाच म्हणतात स्वॅग! आपण मात्र सगळे सपाट चेहऱ्याचे, एकसाचे झालोत का? यावरच आहे आजचा #लक्षअसतंमाझं
Thu, March 10, 2022
देवेंद्र फडणवीस यांच्या लेटेस्ट cctv बॉम्बमुळे खळबळ माजली आहे. सरकारच्या पायालाच त्यांनी हात घातलाय. यावरच आहे आजचा #लक्षअसतंमाझं
Wed, March 02, 2022
सध्या रशिया-युक्रेन संघर्ष पेटलाय. मात्र, भारतात फारच सेंटी होऊन लोक बाजू घेतायत. त्यावरच आहे आजचा #लक्षअसतंमाझं
Wed, February 16, 2022
कालपासून सेना नेते संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेबाबत भरपूर उलटसुलट चर्चा सुरु आहेत. मात्र, भाजप नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करणं इतकाच उद्देश या पत्रकार परिषदेचा होतं का? यावरच आहे आजचा #लक्षअसतंमाझं
Mon, February 14, 2022
अण्णा आणि अण्णांचं उपोषण याची गेल्या काही काळात खूप थट्टा झालीये. आताही वाईन प्रकरणात तेच झालंय. मात्र, यमुळे 'अण्णा' या नावाचा दरारा कमी झालाय का? यावरच आहे आजचा #लक्षअसतंमाझं
Wed, February 09, 2022
पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्र काँग्रेसवर कोरोनाच्या पहिल्या लाटेत श्रमिकांना आपापल्या राज्यात रेल्वेने पाठवून कोरोना पसरवायचा आरोप केलाय. दुसरीकडे, कर्नाटकात शाळेबाहेर हिजाब घातलेल्या मुस्लिम महिलांना हिंदुत्ववादी टार्गेट करतायत. यातला कोरोना आटोक्यात येईलही पण धर्मांध विद्वेषाचं काय? यावरच आहे आजचा #लक्षअसतंमाझं
Tue, February 08, 2022
महाराष्ट्रात सडकी, विकृत मनोवृत्ती वाढत चालली आहे. मोठ्या माणसाच्या निधनानंतर गलिच्छ भाषेत वाट्टेल ते लिहिलं जातंय. यात लतादीदींच्या अंत्यसंस्कारावेळी शाहरुखच्या प्रार्थनेलाच शिव्या देण्याचे प्रकार घडले. ही कोणती विकृत भूक आहे? यावरच आहे #लक्षअसतंमाझं
Fri, February 04, 2022
Wed, February 02, 2022
इन्स्टाग्राम आणि आधी टिकटॉक वरच्या उथळ सोंगाड्यांना डोक्यावर घेण्याचे परिणाम आता दिसू लागले आहेत. समाजानेच आता अशांच्या मागे किती फरपटायचं ते ठरवायला हवं. यावरच आहे आजचा #लक्ष असतं माझं
Sat, January 29, 2022
सुपमार्केटमध्ये वाईन विक्रीच्या दृष्टीने शासनाने निर्णय घेतलाय. यावर टीका जरूर होऊ शकते. मात्र, लगेच आपल्या राज्याला 'मद्यराष्ट्र' म्हणण्यापर्यंत काहींची मजल गेली. यावरच आहे आजचा #लक्षअसतंमाझं
Tue, January 25, 2022
जगप्रसिद्ध झालेल्या डिसले गुरुजींचा आपणा सर्वांना अभिमान आहे. मात्र, त्यांच्या कामाबद्दल काही प्रश्नही लोकांनी, प्रशासनाने उपस्थित केले आहेत. यावरच आहे आजचा #लक्षअसतंमाझं
Mon, January 24, 2022
महात्मा गांधीचा खुनी नथुराम गोडसेवरील एका फिल्मध्ये, नथुरामची भूमिका करण्यावरून सध्या अभिनेते डॉ. अमोल कोल्हे वादात सापडलेत. मात्र, सगळी टीका अत्यन्त चुकीच्या मुद्द्यावरून चालू आहे. यावरच आहे आजचा #लक्ष असतं माझं
Tue, January 18, 2022
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान मोदींबद्दल वापरलेल्या आक्षेपार्ह भाषेवरून त्यांच्यावर जोरदार टीका होतेय. त्यावरच आहे आजचा #लक्षअसतंमाझं
Mon, January 17, 2022
अभिनेते किरण माने सध्या चर्चेत आहेत. एका वाहिनीवरील सिरीयलमधून त्यांना काढण्याचं निमित्त झालं आणि मीडिया, सोशल मीडियावर वादाचा आग्या मोहोळ उठला. कुणी त्यांना एकदम हिरो केलं तर कुणी व्हिलन ठरवलं. यावरच आहे आजचा #लक्षअसतंमाझं
Fri, January 14, 2022
मराठी पाट्यांच्या सक्तीवर चक्क काही मान्यवर मराठी लोकांनीच नाकं मुरडली आहेत. आपल्याच भाषेला असं हलक्यात घेण्याची आपली वृत्ती का झालीये? यावरच आहे आजचा #लक्ष असतं माझं
Wed, January 12, 2022
राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढू लागलेत. त्यामुळे सरकारने काळजी घेणं योग्यच. त्यानुसार काही निर्बंध असणंही स्वाभाविकच. मात्र, सध्या ज्या प्रकारे परस्परविरोधी निर्बंध लावले जातायत, त्यामुळे जनता हैराण आहे. यावरच आहे आजचा #लक्षअसतंमाझं
Tue, January 11, 2022
मोदींचा पंजाब दौरा, त्यात सुरक्षेबाबत झालेला प्रकार आणि आता येऊ घातलेल्या 5 राज्यांच्या निवडणुका यांचा महत्वाचा संबंध आहे. देशात समर्थक विरोधकांची जणू यादवी सुरू आहे. यावरच आहे आजचा #लक्ष असतं माझं
Thu, January 06, 2022
बुलीबाई ऍपनं मुस्लिम महिलांचाच अपमान केला नाही, तर समाज म्हणून आपण किती अप्पलपोटे झालोय हेही दाखवलंय. त्याहून भयानक म्हणजे आपला धार्मिक विद्वेष शमवण्यासाठी विकृत लोक स्त्रीच्या अब्रूवर घसरलेत. यावरच आहे आजचा #लक्ष असतं माझं
Wed, January 05, 2022
अण्णाभाऊ हे प्रसिद्ध नाहीत आणि त्यामुळे महामानवही नाहीत, असा उल्लेख केंद्राच्या एक फौंडेशनच्या पत्रात झाला आणि देशातून टीका झाली. याच पार्श्वभूमीवर अण्णाभाऊंची महती सांगणारा #लक्षअसतंमाझं
Tue, January 04, 2022
क्रांती ज्योती सावित्रीबाई फुलेंची अनेक लेकी-लेकरं आज विविध क्षेत्रात मोठी झालीत. मात्र, रूढी-परंपरा-अंधश्रद्धा- चंगळवाद-धर्मांधता यात अडकलेली लेकरं कधी सुधारणार? यावरच आहे आजचा #लक्ष असतं माझं
Fri, December 31, 2021
MPSC च्या नव्या परिपत्रकानुसार आयोगाच्या कामकाजावर टीका केल्यास उमेदवारांवर कारवाईचा इशारा देण्यात आलाय. मात्र, शासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांना लागू असणारे नियम उमेदवारांना लावणं योग्य आहे? यावरच आहे आजचा #लक्ष असतं माझं
Tue, December 28, 2021
कुणा एका कालीचरण बाबाने महात्मा गांधींबद्दल केलेल्या वक्तव्याने खळबळ माजली आहे. काँग्रेसने त्यावर पोलिसात तक्रारही दाखल केलीये. मात्र, गांधींच्या खुनाचे समर्थन करणाऱ्याला या बाबाला बापू कळलेच नाहीत. यावरच आहे आजचा #लक्षअसतंमाझं
Mon, December 27, 2021
संरक्षण दलांमध्ये भरतीसाठी नुकत्याच पार पडलेल्या 'संयुक्त संरक्षण सेवा परीक्षेत' आपल्या अमरावतीच्या अपूर्व पडघनने देशात पहिला क्रमांक पटकावलाय. त्यावरच आहे आजचा #लक्षअसतंमाझं
Thu, December 23, 2021
एका संशोधनानुसार आपण भारतीय मोठ्या प्रमाणात कारण नसताना आणि डॉक्टरांना न विचारता वेगवेगळ्या औषधांचं सेवन करतो. मात्र, याचे धोकादायक परिणाम होऊ शकतात. यावरच आहे आजचा #लक्षअसतंमाझं
Wed, December 22, 2021
एका मराठी रिऍलिटी शोमध्ये सहभागी मुला-मुलीला इंग्रजी अंकांची मराठी नावं विचारली तर ती त्यांना सांगता आली नाहीत. चीड आणणारी बाब म्हणजे याचा तिथल्या परीक्षकांना खेद तर नव्हताच, उलट ती मंडळी हसत होती. यावर चीड व्यक्त करणारी पोस्ट अभिनेत्री चिन्मयी सुमित यांनी लिहिली आहे. यावरच आहे आजचा #लक्षअसतंमाझं
Tue, December 21, 2021
भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृह मंत्री अमित शहा काल पुण्यात होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका करताना त्यांनी मुख्यमंत्री पदाच्या त्याच जुन्या वादाला फोडणी दिली. देवेंद्र हेच 2019ला मुख्यमंत्री व्हायचं ठरलं होतं, हे उद्धव यांनीही माहित होतं, असा त्यांचा दावा आहे. तर, स्वतः उद्धव मात्र वेळोवेळोवेळी भाजपनं विश्वासघात केल्याचं म्हणत आले आहेत. यावरच आहे आजचा #लक्ष असतंमाझं
Thu, December 09, 2021
पळून जाऊन लग्न केल्याच्या रागातून नुकतीच आईच्या मदतीने भावाने बहिणीचा शिरच्छेद केल्याचा भयंकर प्रकार घडला. वाईट म्हणजे या बातमीवर समाज माध्यमात खुनाचं समर्थन करणाऱ्या प्रतिक्रियाहिब पाहिला मिळतायत. यावरच आहे आजचा #लक्षअसतंमाझं
Mon, December 06, 2021
पटो ना पटो पण अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे महाराष्ट्राचे वैभव आहे. मात्र, गेल्या दोन्ही खेपेस संमेलनाध्यक्षांच्या तब्येतीने दगा दिला. या युवा भारतात आपल्याला इतक्या वर्षात एकही 50शीच्या आतील लेखक संमेलनाध्यक्ष करावा असं वाटू नये का? यावरच आहे आजचा #लक्ष असतं माझं
Sat, November 27, 2021
'सकाळ-साम'च्या 'मूड महाराष्ट्राचा' या महासर्वेक्षणाची सध्या राज्यभर चर्चा आहे. एकूणच महाविकास आघाडी सत्तेत परत येण्याची चिन्ह आहेत. उद्धव ठाकरे सर्वाधिक मतांसह पसंतीचे मुख्यमंत्री आहेत. पण, तरीही भाजप नेते देवेंद्र फडणवीस वेगळे ठरतात. त्यावरच आहे आजचा #लक्षअसतंमाझं
Tue, November 23, 2021
काँग्रेसची अडचण त्यांच्या विरोधकांपेक्षा अनेकदा आतलेच लोक अनेकदा करतात. गेल्या काही दिवसात सलमान खुर्शीद आणो मणिशंकर अय्यर यांची वक्तव्येच हे दाखवतात. त्यावरच आहे आजचा #लक्षअसतंमाझं
Mon, November 22, 2021
सध्या शेअर बाजाराची घसरगुंडी सुरू आहे. धक्का म्हणजे पेटीएमच्या शेअरची किंमत त्याच्या IPO इतकीही राहिली नाहीये. मार्केटचं असं का होतंय? यावरच आहे आजचा #लक्ष असतं माझं
Sun, November 21, 2021
अभिनेत्री कंगनाच्या बाष्कळ बडबडीपाठोपाठ, तिला समर्थन देण्यावरून आणि व्हाट्सऍपवरील मेसेजेस पुरावे म्हणून मंडण्यावरून ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले टीकेचे लक्ष्य ठरलेत. यावरच आहे आजचा #लक्षअसतंमाझं
Sat, November 20, 2021
शेतीविषयक केंद्राचे 3 कायदे मागे घेण्याची घोषणा मोदींनी आज केली. मोदी विरोधक तर आज उत्साहात आहेतच, मात्र मोदी समर्थकही याला 'मास्टरस्ट्रोक' म्हणतायत. यावरच आहे आजचा #लक्षअसतंमाझं
Wed, November 17, 2021
प्रहसनकार वीर दासने अमेरिकेत सादर केलेल्या एका कवितेमुळे तो ट्रोल होतोय, त्याच्या देशभक्तीवर शंका घेतली जातेय. देशाचा अवमान केल्याचा आरोप होतोय. मात्र, भारतात-महाराष्ट्रात देशाला नव्हे तर इथल्या व्यवस्थेला धारेवर धरणाऱ्या अनेक कविता झाल्या आहेत. त्यावरच आहे आजचा #लक्षअसतंमाझं
Tue, November 16, 2021
आज राष्ट्रीय पत्रकार दिन. आजकालच्या पत्रकारितेवर प्रचंड टीका होतेय. त्याचेही इलेक्ट्रॉनिक मीडिया, डिजिटल मीडियाला ठोकून काढलं जातंय. त्यावरच आहे आजचा #लक्षअसतंमाझं
Tue, November 16, 2021
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आज शिवत्वात विलीन झाले. शिवइतिहासाच्या विशाल सागरातील ओंजळभर मोती त्यांनी महाराष्ट्राला दिले. 'साम' टीव्हीला दिलेली मुलाखत ही त्यांची शेवटची मुलाखत ठरली. त्यानिमित्त उमजलले शिवशाहीर यावरच आहे आजचा #लक्ष असतं माझं
Fri, November 12, 2021
एस. टी. कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरुच आहे. सरकारनेही कठोर भूमिका घेतलीये. मात्र, महाराष्ट्राला एकत्र जोडणाऱ्या, गरिबांच्या प्रवासाचे साथीदार असलेल्या या एस. टी. कर्मचाऱ्यांना एकटं पाडलं जाऊ नये. अन्यथा, कामगार दिनी स्थापन झालेला महाराष्ट्र कामगार द्रोही ठरेल! यावरच आहे आजचा #लक्षअसतंमाझं
Thu, November 11, 2021
कंगना राणावतनं पुन्हा एकदा आपल्या बौद्धिक दिवाळखोरीचं रूप दाखवलं. पद्मश्री पुरस्कार मिळालेल्या या अभिनेत्रीने एका जाहीर कार्यक्रमात चक्क भारताच्या स्वतंत्र्याला भीक ठरवलं! यावरच आहे आजचा #लक्ष असतं माझं
Thu, November 04, 2021
भारताला फक्त 99 वर्षांपुरता लीजवर स्वातंत्र्य मिळालं, असं विधान भाजप युवा मोर्चाच्या रुची पाठक यांनी एका कार्यक्रमात केलं. यावर त्यांना प्रचंड ट्रोल करण्यात आलं. मात्र, सोशल मोडिया वरचे पडताळणी न केलेले मेसेज आणि व्हाट्सएप युनिव्हर्सिटीचे लोक कसा भ्रम पसरवू शकतात ते यातून कळलं. मात्र, हा प्रकार किती घातक असू शकतो, त्यावरच आहे आजचा #लक्ष असतं माझं
Wed, November 03, 2021
'जय भीम' या नावाची एक तमिळ फिल्म आलीये. लीगल ड्रामा आहे. वंचित समूहाला ठरवून टार्गेट कसं केलं जातं, त्याचं चित्रण आहे. OTT वरही ही फिल्म आलीये. मात्र, आजही बॉलिवूड सामाजिक वास्तवाला धरून, वेगळा विचार देणाऱ्या फिल्म बनवतं का? यावरच आहे आजचा #लक्षअसतंमाझं
Mon, November 01, 2021
आरोग्य भरती परिक्षेचा कसा बोजवारा उडाला ते 'साम'ने दाखवलं. मात्र, इतरवेळी एखाद्या मंत्र्याबद्दल आरोप करायला पुढे येणारे किंवा कुणा अधिकाऱ्यांची कुंडली काढणारे असे किरीट सोमय्या किंवा नवाब मलिक या प्ररकणात पुढे आले नाहीत. यावरच आहे आजचा #लक्षअसतंमाझं
Fri, October 29, 2021
आर्यन खानला जामीन मिळतोय. मात्र, एका पार्टीत ड्रग पकडण्याच्या धाडीवरून सुरू झालेले हे प्रकरण, प्रत्यक्षात पडद्यामागील अनेक राजकारणांनी भरलंय. आताही याचं फक्त एक प्रकरण संपलय. यावरच आहे आजचा #लक्षअसतंमाझं
Thu, October 28, 2021
'सरदार उधम' ही फिल्म भारतातर्फे ऑस्करसाठी पाठवली गेली नाही. त्यामागे चित्रपट निर्मिती मूल्य या दृष्टीने करणं असती तर ठीक होतं. मात्र, निवड समितीचे सदस्यच जेंव्हा म्हणतात की, "या फिल्ममुळे ब्रिटिश द्वेष दिसतो", तेंव्हा मात्र संताप आल्याशिवाय राहत नाही. यावरच आहे आजचा #लक्षअसतंमाझं
Tue, October 26, 2021
आरोग्य सेवा भरती प्रक्रियेचा घोळ संपता संपत नाहीये. विद्यार्थ्यांच्या सहनशीलतेचा कडेलोट होतोय. आर्यन-वानखेडे प्रकरणात रस घेणारे मंत्री आहेत, मग या विद्यार्थ्यांसाठी वेळ कुणालाच नाही का? यावरच आहे आजचा #लक्षअसतंमाझं
Sat, October 23, 2021
NCB चे अधिकारी समीर वानखेडे आणि मविआ सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांच्यात सध्या वाद सुरू आहे. आर्यन खान अटकेनंतर सुरू झालेलं हे प्रकरण आता व्यक्तिगत होताना दिसतंय. मात्र, सरकारी मंत्री विरुद्ध सरकारी अधिकारी हे चित्र अंतिमतः शासनालाच मारक ठरणार नाही का? यावरच आहे आजचा #लक्षअसतंमाझं
Thu, October 21, 2021
'फॅब इंडिया'च्या जाहिरातीपासून सुरू झालेला वाद आता जाहिरात करणाऱ्या महिलांच्या टिकली लावणं/न लावण्यापर्यंत आलाय. यावरून आता टिकली नसलेल्या मॉडेल नसतील तर त्या सेवा-उत्पादनांवर बहिष्कार घालण्याची भाषा बोलली जाऊ लागलीये. सोशल मिडीयाचा आणखी एक ट्रेंड, यापलीकडे काय आहे या प्रकाराचं गांभीर्य? यावरच आहे आजचा #लक्षअसतंमाझं
Wed, October 20, 2021
कधी तनिष्क, कधी मान्यवर तर कधी फॅब इंडिया...गेल्या काही दिवसात हे ब्रॅण्डस त्यांच्या जाहिरातीवरून हिंदुत्ववाद्यांच्या टार्गेटवर आले. लगेच अभिव्यक्ती स्वातंत्र्य विरुद्ध दडपशाही असा वाद सुरू झाला. मात्र, याकडे वेगळ्या नजरेने बघता येईल का? यावरच आहे आजचा #लक्षअसतंमाझं
Mon, October 18, 2021
हिंदूंचे हिंदूराष्ट्र ही कल्पना तशी जुनी. आता त्याचे नवे समर्थक बनतायत राज ठाकरे. मनसेच्या हिंदुत्ववादी नूतनीकरणानंतर राज ठाकरे आता अयोध्येला जातायत. त्या पार्श्वभूमीवर त्यांच्याकडे आज हिंदू धर्मगुरू, साध्वी आल्या. यावरच आहे आजचा #लक्षअसतंमाझं
Sat, October 16, 2021
Fri, October 15, 2021
Thu, October 14, 2021
शरद पवार हे शांत स्वभावाचे मुरब्बी राजकारणी म्हणून ओळखले जातात. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पवार आक्रमक होताना पाहायला मिळतायत. सहकार क्षेत्रावर केंद्राचे अप्रत्यक्ष दडपण असो की लखीमपूर-मावळ वाद, पवार बेधडक बोलतायत. यावरच आहे आजचा #लक्षअसतंमाझं
Sat, October 09, 2021
अखेर सरकारी हवाई वाहतूक सेवा एअर इंडिया टाटांकडे गेली. अनेक वर्षे एअर इंडियाचे ओझे सरकारवर होते. मात्र, या खासगीकरणावरून मोठी टीका होतेय. खाजगीकरण इतकं वाईट का ठरवलं जातंय? यावरच आहे आजचा #लक्षअसतंमाझं
Thu, October 07, 2021
आज अजित पवारांच्या निकटवर्तीयांच्या निवासस्थानी आणि अन्य ठिकाणी आयकर खात्याने तपास केला. यावरून बराच वाद सुरू झालाय. त्यावरच आहे आजचा #लक्षअसतंमाझं
Thu, October 07, 2021
लोक मीडियाला नावं ठेवतात, पण चर्चा मसालेदार बातम्यांचीच करतात. महेश मांजरेकरांचा आगामी 'गोडसे' हा पिक्चर आणि शाहरुखचा मुलगा आर्यनची ड्रग्ज कॉन्ट्रोव्हर्सि ही याचीच उदाहरणं! मग, उत्तर प्रदेशातील लाखीमपूरमध्ये शेतकऱ्यांचं काय झालं, कुणाला फरक पडतो? यावरच आहे आजचा #लक्षअसतंमाझं
Thu, September 30, 2021
"आझादी, आझादी"च्या घोषणांनी आणि सरकारविरोधी तडाखेबंद भाषणांनी गाजलेला तरुण कन्हैया कुमार अखेर काँग्रेसवासी झालाय. मूळचा डाव्या विद्यार्थी चळवळीतून पुढे आलेला आणि भाकपमध्येही वरच्या फळीत गेलेल्या कन्हैयाला काँग्रेस हा पर्याय का वाटावा? काँग्रेसवर काळासोबत नसल्याची टीका होत असताना उलट डावेच मागे पडलेत का? कन्हैयाही प्रोफेशनल राजकारणी ठरला का? यावरच आहे आजचा #लक्षअसतंमाझं
Tue, September 28, 2021
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांचा निकाल जाहीर झाला. मोठ्या कष्टाने अनेक मुलं-मुली उत्तीर्ण होऊन आता IAS, IPS होतील. मात्र, त्यांचं कौतुकही जात पाहून होताना दिसलं. जातनिहाय याद्या फिरू लागल्या. अगदी प्रादेशिक अस्मिताही दिसू लागल्या. यावरच आहे आजचा #लक्षअसतंमाझं
Thu, September 23, 2021
'अशीही बनवाबनवी' या तुफान लोकप्रिय कॉमेडी चित्रपटाला 33 वर्ष पूर्ण होतायत. यातील अनेक प्रसंग, डायलॉग लोकांना तोंडपाठ आहेत. शेकडो मिम्स बनलेत. पिढी दर पिढी फिल्मचे फॅन्स बनतायत. त्यावरच आहे आजचा #लक्षअसतंमाझं
Thu, September 23, 2021
प्रसिद्ध नाट्य दिग्दर्शक, अभिनेते अतुल पेठे यांचं 'शब्दांची रोजनिशी' हे नाटक पोलिसांनी कोरोनाचं कारण पुढे करत होऊ दिलं नाही. खरं तर नाटकावेळी सर्व प्रतिबंधात्मक काळजी घेतली जाणार होती. पण, राजकीय सभा, मोर्चे, मिरवणुका इथं गुमान राहणारे पोलीस कलाकारांना मात्र सर्व नियम लावतायत. यावरच आहे आजचा #लक्षअसतंमाझं
Tue, September 21, 2021
गेल्या काही दिवसात ST कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्याची बातम्या आल्या. मात्र, हा महाराष्ट्र जणू काही झालेलंच नाही अशा अविर्भावात बुलेट ट्रेन, समृद्धी मार्गाचे गोडवे गातोय. आपली संवेदनशीलता इतकी मेलीये? यावरच आहे आजचा #लक्षअसतंमाझं
Mon, September 20, 2021
भाजप नेते किरीट सोमय्यांनी गेले काही महिने सरकारमधील मंत्र्यांना आणि पर्यायाने सरकारलाही अडचणीत आणलंय. आता त्यांचं ताजं लक्ष्य मंत्री हसन मुश्रीफ आहेत. सोमय्यांना रोखण्याचे सर्व प्रयत्न व्यर्थ ठरलेत, सरकार जसजसे आक्रमक होतेय, तसे किरीट सोमय्या हिरो होतायत. त्यावरच आहे आजचा #लक्षअसतंमाझं
Thu, September 16, 2021
भाषिक अस्मिता जागृत झाल्या आहेत. एकीकडे जसं हिंदीला उगाच राष्ट्रभाषा म्हणून लादण्याचा अट्टहास चुकीचा, तसंच हिंदीचा द्वेष करणंही चूकच. यावरच आहे आजचा #लक्षअसतंमाझं
Wed, September 15, 2021
OBC आरक्षणासाठी सरकार अध्यादेश काढणार असं मंत्री छगन भुजबळ यांनी जाहीर केलं. मात्र, हा अध्यादेशाचा मार्ग सरकारला अडचणीत आणेल? ओबीसी समाजाची समजूत अशाने निघेल का? यावरच आहे आजचा #लक्षअसतंमाझं
Fri, September 10, 2021
अभिनेता सिद्धार्थ शुक्ला मृत्यूनंतर अतिरेकी व्यायाम, हेल्थ सप्लिमेंट, प्रोटीन इनटेक याची चर्चा सुरू झालीय. अशा हेल्थ फुडचे दुष्परिणामही समोर येतायत. यावरच आहे आजचा #लक्षअसतंमाझं
Thu, September 09, 2021
परवा पुण्यात झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणाने आपण सारे हादरलो आहोत. ही घटना पहिली नाही आणि दुर्दैवाने शेवटची असण्याचीही शक्यता नाही. मात्र, हे वाढते बलात्कार कशाचं द्योतक आहेत? अशाने मुली-महिलांनाच स्वातंत्र्याची किंमत द्यावी लागते त्याचं काय? यावरच आहे आजचा #लक्षअसतंमाझं
Wed, September 08, 2021
सध्या देशात 'नॅशनल मोनेटाइजेशन पाईपलाईन'ची चर्चा आहे. भाजपेतर पक्षांनी हे म्हणजे 'देश भाड्याने देण्याची दुर्बुद्धी' म्हटलंय, तर भाजप सरकारने यातून सरकारला लोकोपयोगी प्रकल्पांसाठी पैसा उभा राहील, असा दावा केलाय. कोणती बाजू आहे खरी? यावरच आहे आजचा #लक्षअसतंमाझं
Mon, September 06, 2021
भाजप नेत्या पंकजा मुंडे या आपल्या मुलाला उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत सोडायला गेल्या. त्याबद्दलची पोस्टही त्यांनी शेअर केली. मात्र, त्यावर ट्रोलिंगच जास्त झालं. अर्थात, त्यातील काही मुद्दे नक्कीच विचारात पाडणारे आणि राजकारण्यांचे डोळे उघडणारे आहेत. यावरच आहे आजचा #लक्षअसतंमाझं
Fri, September 03, 2021
गॅस, डिझेल, पेट्रोल अश्या GDPच्या दरवाढीवरून काँग्रेसचे राहुल गांधी यांनी भाजपवर टीका केली. त्यावरून, जोरदार राजकीय आरोप-प्रत्यारोपही झाले. मात्र, राजकारणापलीकडे जाऊन पाहता महागाई हे आजचं वास्तव आहे की नाही? यावरच आहे आजचा #लक्षअसतंमाझं
Sat, August 28, 2021
हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व मानायचं असेल, तर त्याची दोन उदाहरणे म्हणजे अभिनेत्री स्वरा भास्कर आणि ऑलिंपिकपटू नीरज चोप्रा. स्वरा तिच्या गृह पुजेमुळे हिंदुत्ववाद्यांच्या टिकेचं लक्ष्य ठरली, तर नीरजने पाकिस्तानी भालाफेकपटूबद्दलच्या काँट्रॅव्हर्सिवर स्पष्टीकरण दिलंय. काय आहेत हे विषय? कोण आहेत जे इतरांची धर्म-राष्ट्र निष्ठा ठरवतात? यावरच आहे आजचा #लक्षअसतंमाझं
Fri, August 27, 2021
नवऱ्याकडून पत्नीसोबत बळजबरीने जरी संभोग झाला, तरी तो बलात्कार ठरत नाही, असा निवडा छत्तीसगड उच्च न्यायालयाने दिलाय. न्यायालय कायद्यांना बांधील आहे, हे मान्यच. मात्र, समाज आणि देश म्हणून आपण हे मान्य करायचं का? यावरच आहे आजचा #लक्षअसतंमाझं
Thu, August 26, 2021
आज दिवसभर राणे प्रकरणावरून जे झालंय, त्यामुळे सेना आक्रमक झालेली दिसली, भाजपही स्वस्थ बसणार नाही, हे फडणवीस सूचित करतायत. दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांना कोंबडा वगैरे म्हटलं जातंय. मात्र, या सर्व घडामोडीमागे आहे खोल राजकारण. यावरच आहे आजचा #लक्षअसतंमाझं
Mon, August 23, 2021
अफगाणिस्तानवर तालिबानने नियंत्रण मिळवलं आहे. भारताने यापूर्वीही आणि आताही तालिबानसोबत संबंध न ठेवण्याची भूमिका घेतलीये. मात्र, भारताच्या, द. आशियाच्या हितासाठी हे योग्य होईल का? भावनेच्या भरात आपण व्यवहाराकडे दुर्लक्ष करतोय का? यावरच आहे आजचा #लक्षअसतंमाझं
Fri, August 20, 2021
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पुण्यातल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर राज्यात जातीपातीचे राजकारण सुरू झाल्याचं पुन्हा म्हटलं. मात्र, त्यांच्या न्यायाने देशात हिंदू-मुस्लिम द्वेषाचं राजकारण कुणी सुरू केलं? हाही प्रश्न विचारावा लागेल. यावरच आहे आजचा #लक्षअसतंमाझं
Tue, August 17, 2021
फेसबुक, गुगलच्या लोकांनी काम सुरू केलंय. मोठमोठ्या देशांनी यावर लक्ष द्यायला सुरुवात केलीये. वर्क फ्रॉम होम ज्यांना क्रांती वाटत होती, त्यांनाही अचंबा वाटेल असा हा प्रकार आहे. तुमचं व्यक्तिमत्वच इंटरनेटवर अपलोड करून जगण्याचा अवतार आहे...मेटाव्हर्स. यावरच आहे आजचा लक्षअसतंमाझं
Mon, August 16, 2021
अखेर काबूल तालिबान्यांच्या हातात पडलं. अफगाणिस्तानात तालिबानी राजवट प्रस्थापित झाली. मात्र, तालिबान हे सगळं ज्या ध्येयातून करतोय, त्या इस्लामी राजवटीच्या संकल्पनेची चर्चा होत नाहीये. याशिवाय, अफगाणिस्तानच्या 'ग्रेट गेम'मागच्या छुप्या सुत्रधारांच्या चेहऱ्यावर मोठा खुलासा! #लक्षअसतंमाझं
Fri, August 13, 2021
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी 'साम टीव्ही'ला दिलेली मुलाखत सध्या गाजतेय ती त्यातल्या एका प्रश्नावरील उत्तरामुळे. शिवरायांचं स्वराज्य हे स्वा. सावरकर म्हणतात तशी 'हिंदुपदपादशाही' होती, असं पुरंदरे म्हणाले. या उत्तरामुळे आता नवे प्रश्न तयार होणार आहेत. यावर आता डॉ. हरी नरके आदी अभ्यासकांनी टीकाही सुरू केलीये. यावरच आहे आजचा #लक्षअसतंमाझं
Wed, August 11, 2021
सध्या अनेकदा बातम्या समोर येतायत की क्षुल्लक किंवा गंभीर कारणावरून घट्ट रक्ताचे नातेवाईकही हिंस्त्र होतायत. मुलानं वडिलांना मारलं, मुलीने आईला संपवलं, मुलांच्या आत्महत्त्या आणि अशा अनेक बातम्या. मात्र, हे असं का होतंय? यावरच आहे आजचा #लक्षअसतंमाझं
Tue, August 10, 2021
राज्याला OBC सूची बनवण्याची मुभा देणाऱ्या विधेयकावर आज संसदेत फैसला होतोय. हे विधेयक दोन्ही सभागृहात पारित होण्याची चिन्ह आहेत. यामुळे, OBC मध्ये समाविष्ट होण्यासाठी संघर्ष करणाऱ्या देशातील अनेक समूहांच्या लढ्याला यश येण्याची शक्यता आहे. शिवाय, जाती आधारित जनगणनाही याद्वारे महत्वाची ठरू शकेल. यावरच आहे आजचा #लक्षअसतंमाझं
Fri, August 06, 2021
स्व. राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव आता 'मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार' झालंय. यावरून देशात राजकीय वादही सुरू झालाय. मात्र, खरंच गांधी घराण्याची नावं या देशात ज्या घाऊक प्रमाणात देण्यात आली, त्याची ही प्रतिक्रिया आहे का? की हा मोदी-भाजपचा गांधी-काँग्रेस द्वेष आहे? यावरच आहे आजचा #लक्षअसतंमाझं
Thu, August 05, 2021
सध्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये आपले खेळाडू विविध क्रीडाप्रकारात मेडल मिळवतायत. त्यांच्या कष्टाबद्दल कौतुकच. मात्र, त्याचवेळी अशा विजेत्यांची जात नेटवर शोधण्याचा ट्रेंड समोर येतोय. याच सडक्या मनोवृत्तीवर आहे आजचा #लक्षअसतंमाझं
Wed, August 04, 2021
सध्या आपले राज्यपाल कोशयारी भलतेच फॉर्ममध्ये आहेत. विधान परिषदेतील 12 सदस्यांची नियुक्ती राहिली दूरच, मात्र साहेब सध्या राज्याच्या दौऱ्यावर आहेत. अधिकाऱ्यांना भेटीसाठी बोलावताहेत. यावर म.वि.आच्या नेत्यांनी मात्र आक्षेप घेतलाय. राज्यपाल दुसरं सत्ताकेंद्र चालवतायत असा आरोप केलाय. यावरच आहे आजचा #लक्षअसतंमाझं
Mon, August 02, 2021
छत्रपती शिवाजी महाराज मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या vip गेटवर अदानींचे नाव ठळकपणे आल्यानं आज वाद पेटला. वस्तुतः या विमानतळाला शिवछत्रपतींचे नाव आहे. अशावेळी प्रवेशद्वार किंवा अन्य कुठेही कुणाचे नाव असण्याचा प्रश्नच नाही. मग, हा भलताच आत्मविश्वास येतो कुठून? यावरच आहे आजचं #लक्षअसतंमाझं
Thu, July 29, 2021
सध्या कोरोनाकाळातही अनेक राजकीय कार्यक्रमात झालेल्या गर्दीवर मोठी टीका होतेय. त्यातच आता बार्शीचे अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यांच्या मुलांच्या विवाहावेळी झालेल्या गर्दीवरून टीका सुरू झालीय. एकीकडे रेल्वे बंद, नाट्यगृह बंद, इतर सामान्य लोकांच्या कार्यक्रमांवर नियम, मग राजकारण्यांना वेगळा न्याय का? यावरच आहे आजचा #लक्षअसतंमाझं
Tue, July 27, 2021
'बहुत हुई महंगाई की मार, अब की बार मोदी सरकार' म्हणत मोदी पंतप्रधान झाले, त्यांचं सरकार आलं. मात्र, सध्या परिस्थिती काय आहे? पेट्रोल 100पार, तेलाचे, भाज्यांचे भाव कडाडले त्यात लॉकडाऊन. सामान्य घायकुतीला आलाय. यावर मोदी एखादी 'मन की बात' सांगतील? यावरच आहे आजचा #लक्ष असतं माझं
Mon, July 26, 2021
समर्थकांनो, तुम्हीही चुकताय! चिपळूण, महाडमधल्या अतिवृष्टीनंतर नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आपल्या सहकाऱ्यांसोबत दौरा केला. मात्र, एकेठिकाणी एक महिला आपलं गाऱ्हाणे मांडत असताना, आमदार भास्कर जाधव जसे वागले त्यावर जोरदार टीका झाली. 'साम'नेही हा मुद्दा लावून धरला. जाधवांनी यावर सारवासारव करण्याचा प्रयत्न केलाय, समर्थक तर आमच्यावर तुटून पडलेत. त्या महिलेच्या नंतर आलेल्या वक्तव्याचाही दाखला दिला जातोय. मात्र, हा सगळा प्रकार इतका वरवरचा नाही. यावरच आहे आजचा #लक्षअसतंमाझं
Sat, July 24, 2021
पावसाचं विचित्र झालेलं गणित, वाढती वस्ती, राजकारण्यांची स्वार्थी चालढकल, हवामान विभागाचं हवाई अनुमान, या सगळ्याची एकत्रित परिणती म्हणजे कधी इमारत कोसळणं, कधी चक्रीवादळ, कधी दरड कोसळणं तर कधी पूर येऊन शहराच्या शहर जलमय होणं. दरवर्षी तोच धडा, दरवर्षी तसंच रडा! यावरच आहे आजचा #लक्षअसतंमाझं
Thu, July 22, 2021
22 जुलै. अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस या राज्यातील महत्वाच्या व्यक्तिमत्वांचा आज जन्मदिवस. वेगळे पक्ष, वेगळी विचारसरणी, वेगळे राजकीय प्रदेश...मात्र, दैवगतीने हे दोघे काही काळ एकत्र आले. त्यांचं एकत्र येणं टिकलं नाही, मात्र समजा फडणवीस-पवार सरकार टिकलं असतं तर? या दोघांची केमिस्ट्री कशी राहिली असती? यावरच आहे आजचा #लक्षअसतंमाझं
Tue, July 20, 2021
अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा नवरा राज कुन्द्रा याला पोर्न फिल्म कंटेंट बनवण्याच्या प्रकरणी अटक झालीये. मात्र, पोर्न कंटेंट हे भारतातील एक न्यू नॉर्मल झालंय. सेन्सॉर बोर्डाच्या जाचातून मुक्त अशा डिजिटल प्लॅटफॉर्मवर हा कंटेंट अगदी प्रोफेशनल लेव्हलला बनवला जातोय. मात्र, यामुळे आपल्या पिढीतील प्रेम, रोमांसच्या संकल्पनाच बदलतायत का? यावरच आहे आजचा #लक्षअसतंमाझं
Mon, July 19, 2021
लक्षअसतंमाझंच्या आजच्या पॉडकास्टमध्ये संपूर्ण महाराष्ट्रात भक्तिमय वातावरणात आज साजरी होणाऱ्या आषाढी एकादशी आणि कोरोनामुळे वारकर्यांच्या काय भावना असतील याविषयावर साम टीव्हीचे कार्यकारी संपादक प्रसन्न जोशी यांनी त्यांच्या भावना मांडल्या आहेत. लक्ष असतं माझं या आपल्या दैनंदिन कार्यक्रमात आपण दररोज घडणाऱ्या बातम्यांमधील महत्वाच्या विषयावर 'काहीतरी नवीन बातमीच्या पलीकडील' माहिती तुमच्यापर्यंत पोहचवत असतो. या कार्यक्रमातून साम टीव्हीचे कार्यकारी संपादक प्रसन्न जोशी दररोज समाजातील विविध विषयावर त्यांचे परखड मत मांडणार आहेत. तर दररोज ऐकायला विसरू नका - #लक्षअसतंमाझं
loading...